केडगाव सर्कलचे मंडल अधिकारी उमेश शरदराव गावडे यांचे निधन

। अहमदनगर । दि.25 एप्रिल । उमेश गावडे यांचे निधन अहमदनगर- केडगाव सर्कलचे मंडल अधिकारी उमेश शरदराव गावडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 45 वर्ष होते.

 

त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त विभागीय अधिकारी शरद राव गावडे यांचे ते चिरंजीव होत. 


उमेश गावडे हे 1999 साली नाशिक जिल्ह्यात तलाठी म्हणून नोकरीस लागले त्यानंतर त्यांचे पदोन्नती होऊन मंडलाधिकारी म्हणून केडगाव सर्कल म्हणून ते कार्यरत होते. तसेच अहमदनगर जिल्हा मंडल अधिकारी संघटनेचे ते विद्यमान अध्यक्ष राज्य संघटनेवर त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.

 

एक मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यात ख्याती होती त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. तलाठी संघटना व मंडलधिकारी संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post