। अहमदनगर । दि.29 एप्रिल । जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी व इयत्ता तिसरी या वर्गातून कुणीतरी अज्ञात चोराने त्यांना सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही चोरून नेला ही घटना कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे घडली.
कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील इयत्ता दुसरी व तिसरी या वर्गात बसवलेला बारा हजार पाचशे रुपये किमतीचा बत्तीस इंची पॅनासोनिक कंपनीचा एलईडी टीव्ही वर्गाच्या दरवाज्याचे कडी-कोयंडा उचकटून प्रवेश करून चोरून नेला.
याप्रकरणी कर्जत पोलिसांनी धनंजय फलटणकर ( वय. 43 राहणार कर्जत ) यांच्या फिर्यादीवरून अत्याचाराविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक भांडवलकर हे करीत आहेत.