नगरकरांचा विकेंड लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद

। अहमदनगर । दि.10 एप्रिल । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागेल. यासाठी कडक निर्बंध आवश्यकच आहे. या विकेंड लॉकडाऊनला नगरमध्ये 100 टक्के प्रतिसाद नागरीकांनी दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार शनिवारी 100 टक्के बंद ठेवण्यात आले होते.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत नगरमध्ये विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासूनच संचारबंदी लागू झाली असून प्रमुख चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 



आज (शनिवारी) सकाळपासूनच रस्त्यावरील गर्दी पुर्णपणे थांबलेली दिसून येत होती. माळीवाडा, सावेडी, दिल्लीगेट, मार्केटयार्ड आदी चौकात देखील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वंच ठिकाणी 100 टक्के विकेंड लॉकडाऊनला प्रतिसद देण्यात आला आहे.

शहरातील गजबजलेल्या चितळे रोड, दिल्लीगेट, माळीवाडा, कापडबाजार, सर्जेपुरा, सावेडी रोड, पाईपलाईन रोड, गुलमोहोर रोड आदी परिसरात मेडिकल, दूध डेअरी वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. तर  शहरातील प्रमूख चौकांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले असून येणार्‍या जाणार्‍यांची चौकशी करूनच त्यांना सोडण्यात येत आहे.

विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदी असली तरी लसीकरणासाठी तसेच वेद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडणारांना मुभा देण्यात आली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाही परवानगी देण्यात आलेली आहे. 

आजच्या बंद मुळे शहरातील सर्वच रस्ते शांत होते तर फक्त मेडिकल ची दुकाने सुरु होती, तर शिवभोजनच्या पार्सल थाळीसाठी अनेक ठिकाणी गर्दी  होती. एस.टी.बस स्थानक मध्ये एकही एसटी बस नव्हती. रिक्षा सुरू होत्या पण त्यामध्ये बसण्यासाठी प्रवासी नव्हते अशी परिस्थिती एकंदरीत नगर मध्ये दिसत होती.

 


विकेंड लॉकडाउनमुळे नगरकरांना शनिवारी तसेच रविवारीही बाहेर फिरण्याच्या सवयीला ब्रेक लावावा लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगरकरांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. 

 

नगर तालुक्यातील ग्रामीण भागात वीकेंड लॉकडाऊन : नागरिकांनी दिलेला प्रतिसाद

- - - - - - -


मनपाची पाणीपुरवठा सेवा सुरळीत सुरु होती. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मनपाच्या कर्मचार्‍यांची देखील धावपळ सुरु होती. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मनपा कर्मचार्‍यांनी वाल सुरु करुन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवला.  


Post a Comment

Previous Post Next Post