। अहमदनगर । दि.22 मार्च । घोड्यांना टांग्याला जोडून व त्या टांग्यांची शर्यत लावताना घोड्यांना चाबकाने निर्दयपणे मारहाण केल्याने एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अर्थात या तिघांव्यतिरिक्त अन्य 10 ते 12 अनोळखी व्यक्तींचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलिसांनी 60 हजार रुपये किमतीचे तीन टांगे जप्त केले आहेत.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस नाईक सचिन गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बंडु दंगु बडे, रावसाहेब दंगु बडे (दोघे रा. मेहकरी, ता.जि. अहमदनगर व प्रकाश मच्छिंद्र पोटे (रा. बारदारी, ता.जि.अ.नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
21 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास नगर-कल्याण रोडवर (ता.जि.-अ.नगर) टांग्याच्या शर्यतीची ही घटना घडली. पोलिसांंनी भारतीय दंडविधान कलम रोग प्रतिबंधक (कोवीड प्रादुर्भाव)कलम 188,269,270 सह प्राण्यांना क्रुरपणे वागवणे 1960 चे कलम 11(1) (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची हकीगत अशी की, हिंगणगाव फाटा, कल्याण रोड (ता.जि. अ.नगर) येथे बंडु दंगु बडे, रावसाहेब दंगु बडे (दोघे रा. मेहकरी, ता.जि. अहमदनगर) व प्रकाश मच्छिंद्र पोटे (रा. बारदारी, ता.जि.अ.नगर) व इतर मोटार सायकलवरील 10 ते 12 व्यक्तींनी घोडा या प्राण्यास टांग्यांना जुंपून शर्यत लावून घोेडे शर्यतीत वेगाने पळावे यासाठी त्यांना हातातील चाबकाने क्रुरपणे मारहाण करुन निर्दयतेने वागणूक दिली.
तसेच जिल्हा दंडाधिकारी यांनी कोवीड 19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रोग प्रतिबंधक कलम 188,269,270 सह प्राण्यांना क्रुरपणे वागवणे 1960 चे कलम 11(1) (क) प्रमाणे फिर्याद आहे. पोलिसांनी या प्रकरणी 15 हजार रुपये किमतीचा एक टांगा त्यास दोन चाके असलेला,

20 हजार रुपये किंमत असलेला स्टिल या धातूपासून बनविलेला टांगा त्यास दोन चाके असलेला व पिवळा रंग दिलेला आणि 25 हजार रुपये किमतीचा नारंगी रंगाचा लोखंडी धातूने बनविलेला टांगा त्यास दोन चाके असलेला, असे एकूण 60 हजार रुपये किंमत असलेले तीन टांगे जप्त केले आहेत.