स्मायलिंग अस्मिताने केले आंदोलन
। अहमदनगर । दि.22 मार्च । राज्यात विविध ठिकाणी रविवारी एमपीएससीची परीक्षा झाली. मात्र, या परीक्षेच्यावेळी मराठा आरक्षणासाठी युवकांनी दंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या. तसेच काही विद्यार्थ्यांनी जमिनीवर बसून परीक्षा दिली. मराठा आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्मायलिंग अस्मिता संघटनेने नगरसह राज्यभरात हे आंदोलन केले.
यासंदर्भात माहिती अशी की, रविवारी 21 मार्च रोजी राज्यात विविध ठिकाणी एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात आल्या. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा देशभर गाजत असून मराठा विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू आहे. एमपीएससीच्या संचालकांनी परीक्षा अचानक पुढे ढकलून सामाजिक तेढ निर्माण होईल अशी मध्यंतरी कृती केली होती, असा आरोप स्मायलिंग अस्मिताचे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केला होता.
त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. सोबतच केंद्र आणि राज्य सरकार मराठा आरक्षणावर निर्णायक भूमिका घेताना दिसत नसल्याने या सर्वांचा निषेध म्हणून रविवारी राज्यात विविध ठिकाणी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी परीक्षा बेंचवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून आणि काळ्या फिती बांधून दिल्या.
परीक्षेदरम्यान काही ठिकाणी विद्यार्थ्यी कार्यकर्त्यांना जमिनीवर बसण्यास परिवेक्षक तथा परीक्षा नियंत्रकांनी विरोध दर्शवत दमात घेतले. परीक्षा महत्त्वाची असल्या कारणाने परीक्षार्थींनी काळ्या फितीवरच समाधान केले.
यापुढील सर्वच परीक्षा अशाच प्रकारे देणार असल्याचे यावेळी संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. केंद्र सरकारने सवर्ण आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणावर लोकसभा आणि राज्यसभेत तात्काळ अध्यादेश पारीत करून मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावा, असे मत आंदोलनात सहभागी मराठा विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.