शहर जिल्हा भाजपाच्यावतीने आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन निदर्शने

सरकार जनतेसाठी काम करत नसून स्वत:च्या

फायद्यासाठी काम करत आहेत : भैय्या गंधे

। अहमदनगर  । दि.22 मार्च । माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांबाबत धक्कादायक विधान केले आहे. ही बाब गंभीर असून घटनेचा नगर शहर भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. रविवारी सावेडी भागातील प्रोफेसर चौकात निदर्शने भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

यावेळी भैय्या गंधे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. असे विधान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले. ही बाब गंभीर असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. या सरकारचा आपल्या मंत्र्यांवर कोणताही वचक राहिला नसून, प्रत्येक मंत्री आपल्यासच धुंदीत आहे. भ्रष्टाचार, बलात्कार, खून, दरोडे असे प्रकार सरकारमधील सहभागी मंत्री, आमदारांकडून होत आहेत.

त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकार नाही. सत्तेचा दुरुपयोग करुन उपभोग’ घेण्याकडेच मंत्र्यांचे लक्ष आहे. जनतेचे त्यांना काहीही देणे घेणे नाही. सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले असून, त्यामुळे अनेकांची नोकरी, रोजगार, कामधंदे बुडाले आहेत. जनता औषधावचून मरत आहे, परंतु हे सरकार फक्त आपल्या फायद्यासाठी अनेकांचे बळी देत आहेत.

कोरोनाची भिती घालून यांचे अनाधिकृत उद्योग सुरु आहेत. दिवसेंदिवसे सरकारमधील एक-एक मंत्र्यांची नावे विविध प्रकारणातून पुढे येत आहेत. हे सरकार जनतेसाठी काम करत नसून स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, असा घणाघाती आरोप भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केला.

शहर जिल्हा भाजपाच्यावतीने प्रोफेसर कॉलनी चौकात आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, प्रा.भानुदास बेरड, अ‍ॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, 

 

 महेश नामदे, नगरसेवक उदय कराळे, विलास ताठे, रविंद्र बारस्कर, शुभांगी साठे, सभागृहनेते मनोज दुलम, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी,  शिवाजी दहिंडे,  महिला अध्यक्षा अंजली वल्लाकट्टी, संगीता खरमाळे, मंडल अध्यक्ष वसंत राठोड, सतिश शिंदे, अजय चितळे, महेश तवले,ज्ञानेश्‍वर काळे, बाळासाहेब गायकवाड आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post