पाच वर्षांपासून फरार आरोपी गजाआड; ‘एलसीबी’ची कारवाई

। अहमदनगर ।  दि. 17 ।  जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मागील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. अविनाश रामू बीडकर (वय 30 वर्षे, रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


अविनाश बाळासाहेब शिरसाठ, (वय- 24 वर्षे, रा. भगवान बाबा चीक, पाईप लाईन रोड, अहमदनगर) याला पाण्याच्या टाकीजवळ अज्ञात तीन इसमांनी आडवून त्यातील एकाने मोटारसायकलवरून कॉर्टाजवळ नेऊन सोडण्यास सांगितले. त्यावेळी शिरसाठ याने नकार दिला.


चाकूचा धाक दाखवून बळजबरीने मोटार सायकल व रोख रक्कम असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरुन नला होता. याबाबत ताफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा उघडकीस आणून दोन आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. परंतु, सदर गुन्ह्यातील आरोपी अविनाश बीडकर, रा. भारस्कर कॉलनी, लालटाको, अहमदनगर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.


अहमदनगर शहरातील व जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या आरोपींचा शोध घेणेकामी स्वतंत्र पथकाची नेमणूक करुन आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले होते.


त्याप्रमाणे पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, सफो नानेकर, पोहेकॉ संदिप घोडके, पोना/सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, पोकॉ सागर ससाणे असे फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.


फरार आरोपी अविनाश बीडकर हा लालटाकी परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी लालटाकी येथे जावून मिळालेल्या माहितीवरुन आरोपोचा शोध घेवून व सापळा तावून आरोपी नामे अविनाश रामू बीडकर ास ताब्यात घेवून तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post