। अहमदनगर । दि.02 मार्च । माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे बोधवाक्य घेऊन काम करणा-या न्यू आर्टस, काॅमर्स अॅण्ड सायन्स काॅलेज, अहमदनगरच्या सन १९९६ ते १९९९ राष्ट्रीय सेवा योजना बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र येत ग्रृप बनवला आहे. या ग्रृपच्या माध्यमातून आज जवळपास २०-२२ वर्षानंतर जुने मित्र एकत्र आले आहेत.
आजच्या धकाधकीच्या काळातसुध्दा सर्व सदस्य ग्रृपच्या माध्यमातून एकमेकांच्या सुख दुखात सहभागी होतात. याचा एक भाग म्हणून ग्रृपचू सदस्य सतिश बनकर यांच्या पत्नी सौ. भारती सतिश बनकर यांची पिंपळगाव माळवीच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
ग्रृपमधील अनेक सदस्य आज विविध क्षेत्रात कार्यरत असून आपली पदे व मान सन्मान विसरुन पुन्हा काॅलेज जीवनात रममान होत जुन्या आठवनींना उजाळा दिला. पतीच्या जुन्या मित्र मैत्रिनींनी केलेल्या सत्काराला उत्तर देतांना उपसरपंच भारती बनकर म्हणाल्या की, आजच्या सत्काराने मी भारावून गेले आहे.
उपसरपंच पदावर काम करत असतांना गावातील विकासासाठी सरपंच व सर्व सदस्यांच्या सहकार्याने काम करु. यावेळी ग्रृपमधील सदस्य वसंत शिंदे, गोवर्धन पांडुळे, भगवान दांगट, योगेश एखे, नवनाथ सातपुते, सतिश बनकर, भारती बनकर, कांता बोठे, सीमा चौधरी, उत्तमराव बनकर, संतोष बनकर आदि उपस्थित होते.