। अहमदनगर । दि. 18 । दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
दीपक मारुती जाधव (वय 37, रा. गजराजनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जाधव याने एमआयडीसी परिसरात साईबन रस्त्यावर आयशर टेम्पोच्या टायरची चोरी केली होती. या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाल्यापासून तो फरार झाला होता. ही कारवाई पोनि अनिल कटके, गणेश इंगळे, संदिप घोडके, अण्णा पवार आदिंच्या पथकाने केली.
