। अहमदनगर । दि.17 मार्च । ज्येष्ठ पत्रकार व प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष बाबा जाधव यांच्या मातोश्री श्रीमती पारुबाई जाधव यांचे आज निधन झाले. मृत्यू समयी त्या 77 वर्षांच्या होत्या.
त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
स्व.पारुबाई जाधव यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Tags:
Ahmednagar
