कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

। अहमदनगर । दि.16 मार्च । भरधाव वेगातील कारने पुढे चालणाऱ्या दुचाकीस डाव्या बाजूने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार पायास गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाला. ही घटना स्टेशन रोडवरील इंपिरियल चौक येथे  सोमवारी ( दि.१५ ) घडली. 

 

याबाबतची अधिक माहिती अशी की एड.अनिकेत अनिल कुडाळ ( वय 27 रा. गोंधळी गल्ली माळीवाडा ) त्यांच्या टीव्हीएस व्हीक्टर दुचाकी ( क्र. एम एच १६  यु १७ ) वरून जात असताना स्टेशन रोडवरील इंपिरियल हॉटेल समोर भरधाव वेगात आलेल्या पोलो कार ( क्र. एम एच १६ बी एच  यु 20 45 ) ने त्यांना डाव्या बाजूने धडक दिली.

 

कुलाल यांच्या पायास गंभीर दुखापत झाली. अपघात होताच कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अनिकेत कुलाळ यांच्या फिर्यादीवरून भा द वि कलम 279, 337, 338, 427 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 ( अ ) ( ब ) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस नाईक टकले हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post