। अहमदनगर । दि.16 मार्च । । बीएचएमएसचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्यीनिने आत्महत्या केल्याची घटना सारसनगरमध्ये घडली. अंकिता धर्मा करांडे (वय 24) असे आत्महत्या करणार्या तरुणीचे नांव आहे. आज मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
अंकिता ही तिच्या कुटुंबियांसोबत नगर शहरातील सारसनगर परिसरात राहत होती. सावेडी उपनगरातील अनभुले कॉलेजमध्ये ती बीएचएमएसचे शिक्षण घेत होती. यंदा ती चौथ्या वर्षात शिक्षण घेत होती. अंकिता हिची सध्या परिक्षा सुरु आहे. मंगळवारी सकाळी पावणेसात वाजेच्या दरम्यान, अंकिता तिच्या खोलीतून बाहेर आली व पुन्हा रुममध्ये गेली.
बराच वेळ अंकीता बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबियांनी पाहिले असता अंकिताने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसले. घटनेची माहिती समजताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पेपर अवघड गेल्याने अंकिताने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
