तुळसाबाई पाटीलबा निमसे यांचे निधन

। अहमदनगर । दि.15 मार्च ।  बागरोजा हडको येथील रहिवासी श्रीमती तुळसाबाई पाटीलबा निमसे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.


स्व.तुळसाबाई निमसे यांच्या पश्‍चात तीन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे, पंतवडे असा मोठा परिवार आहे. त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्या ‘ताई’ नावाने सर्वांना परिचित होत्या.

 

नगर मराठा वधू-वर सुचक मंडळाचे अध्यक्ष महादेव निमसे, जिल्हा बँकेतील कॅशिअर गुलाब निमसे, मांडवे येथील प्रगतशील शेतकरी श्रीरंग निमसे यांच्या मातोश्री तर धर्मराज शंकर औटी यांच्या भगिनी होत. त्यांच्या निधनाने पंचक्रोशितून हळहळ व्यक्त होते आहे.

Post a Comment

Previous Post Next Post