महिलेला डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

। संगमनेर। दि.16 मार्च । | सरपण तोडण्याच्या कारणातून जावाने अंगावर डिझेल टाकून अर्चना सदाशिव शिंदे (२४, मनोली) या महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता तालुक्यातील मनोली येथे घडली. 

 

या संदर्भात आश्वी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. जमीन दुसऱ्याला विकल्याचा राग असल्याने फक्त सरपण तोडण्याच्या कारणातून वाद करून जावाने कुऱ्हाडीच्या दाड्यांने अर्चनाला मारहाण केली. डिझेल अंगावर ओतून पेटवून दिले. आरडा ओरड केल्याने मुलींनी पाणी टाकून आग विझवली.

 

अर्चना ६० टक्के भाजल्याने तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अर्चना शिंदेने दिलेल्या फिर्यादीवरून जाव आकांक्षा शंकर शिंदे, सासू हरणाबाई नाना शिदे, भाया शंकर सावित्रा शिदे (मनोली) या तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आश्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Post a Comment

Previous Post Next Post