जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम गायकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

। मुंबई  । दि.16 मार्च । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकचे माजी चेअरमन सिताराम गायकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


यावेळी अजितदादांनी पक्षातील नवीन सदस्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे,  हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर आदरणीय पवार साहेबांनी सर्वसमावेशक राजकारण केलं आहे. 

 

पवार साहेबांनी सर्व जातीच्या नेत्यांना पक्षात सामील करून सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला एकोप्याने पुढे जायचे आहे, इथे कोणाशीही दुजाभाव होणार नाही, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला. आता पक्षात स्वागत केल्यानंतर आता कुठेही जायचं नाही, असे आवाहन अजित पवार त्यांनी नवीन सदस्यांना केले.

 

यावेळी सिताराम गायकर यांच्यासमवेत पर्बतराव नाईकवाडी, भाऊपाटील नवले, विठ्ठल चासकर, आप्पासाहेब आवारी, रोहीदास भोर, भाऊसाहेब काळे, प्रकाश नाईकवाडी, दत्तात्रय भोईर, सचिन शेटे, बाळासाहेब भोर यांसोबत अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला. 

 

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, आ. बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, संदिप वर्पे, घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post