वृद्धाची सोन्याची चेन दोघांनी पळविली

। अहमदनगर । दि. 18 ।  मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 67 वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन ओढून तोडून चोरून नेली. ही घटना पाईपलाईन रोडवरील तुळजाभवानी मंदिरामागे बुधवारी (दि.17) सकाळी नऊ वाजता घडली.


याबाबतची अधिक माहिती अशी की सतीश चंद्रकांत हंगे ( वय.67 रा. चंद्रंगण प्लॉट नं.4 तुळजाभवानी मंदिर मागे पाईपलाईन रोड) हे त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये साफसफाई करीत असताना येथे मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी हातातील कागद त्याना लावून पत्ता विचारला.  


हंगे पत्ता सागण्याच्या तयारीत असताना अचानक चोरांनी  हंगे यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन ओढून तोडून चोरून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सतीश हंगे यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 392,34 जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोळंके हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post