। अहमदनगर । दि.03 मार्च । केडगाव येथील डॉ. शारदा प्रशांत महांडुळे यांना विविध वयोगटानुसार तयार केलेल्या च्यवनप्राशच्या निर्मितीसाठी ग्लोबल नॅशनल रेकॉर्डस् अँड रिसर्च फाउंडेशनचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते डॉ. महांडुळे यांनी स्वीकारला.
डॉ. शारदा महांडुळे यांनी विविध वयोगटानुसार त्यांनी बालप्राश, सखीप्राश, गर्भिणीप्राश, अमृतप्राश, सूर्यप्राश असे च्यवनप्राशचे प्रकार बनवले आहेत. आयुर्वेद क्षेत्रातील डॉ. महांडुळे यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
प्रणव हॉस्पिटल, मीरा मेडिकल फाउंडेशन व दुर्वांकूर पंचकर्म आणि वंध्यत्व निवारण केंद्राच्या माध्यमातून त्या रुग्ण सेवा करीत आहेत.अमृतवेल आयुर्वेदिक उद्यानाच्या माध्यमातून डॉ. महांडुळे आयुर्वेदिक शेती संकल्पना राबवत आहेत. गर्भवती स्त्रियांसाठीच असलेल्या जगातील पहिल्या चवनप्राशची संशोधन निर्मिती डॉ. महांडुळे यांनी केली आहे.
सूर्य प्राश आणि सखी प्राश या त्यांच्या संशोधनातून अनेक वंध्यत्व असणाऱ्या दाम्पत्यांना संतती झालेली आहे. वंध्यत्व समस्या, वारंवार गर्भपात, त्रासदायक गर्भारपण जन्मजात बाळामध्ये वैगुण्य असा इतिहास असणाऱ्या दाम्पत्यामध्ये हे संशोधन वरदान ठरत आहे. अनेक दाम्पत्य टेस्ट ट्युब उपचार करुनही अपत्य प्राप्ती न झाल्याने निराश होतात त्यांच्या साठी हे संशोधन वरदान ठरत आहे.
गर्भसंस्काराच्या सीडी प्रकाशन व पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. आरोग्य विषयक एकुण त्यांनी 5 पुस्तकांचे लेखन केलेले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे नगर शहर व जिल्ह्यातील वैद्यकीय, शैक्षणिक, तसेच सामाजिक क्षेत्रामधून अभिनंदन होत आहे.