एमआयडीसीतील कंपनीतून दोन लाखाच्या कॉपर वायरची चोरी

। अहमदनगर । दि.03 मार्च । कंपनीच्या मागील बाजूचे शटरचे कुलूप  दोन अज्ञात चोरांनी तोडून आत प्रवेश केला.आतील 2 लाख 6 हजार 325 रूपयाचे तांब्याचे बुशेस ,33 किलो तांब्याची वायांडिंग वायर असा माल चोरून नेला . ही घटना रविवारी ( दि.28 )नगर मनमाड रोड वरील एम आय दि सी येथील डेल्को कंपनी येथे घडली.


याबाबतची माहिती अशी की दत्तात्रय प्रभाकर देशमुख ( वय 65 रा.बँक ऑफ बडोदा जवळ सावेडी ) याची एम आय डी सी मध्ये डेल्को नावाची कंपनी आहे.  रविवारी दि 28 च्या रात्री त्या कंपनीच्या मागील बाजूचे शटरचे कुलूप  दोन अज्ञात चोरांनी तोडून आत प्रवेश केला.आतील2 लाख 6 हजार 325 रुपयांची तांब्याची बुशेष आणि 33किलो वजनाची तांब्याची वायडिंग वायर चोरून नेली.

 

या प्रकरणी दत्तात्रय प्रभाकर देशमुख यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलिसांनी भा द वि कलम 380 461 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली .पोलीस उपनिरीक्षक कणसे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post