। अहमदनगर । दि.02 मार्च । वाहनाचे टायरव पंचर झाल्याने टायर बदलत असलेल्या वाहन चालकास दोन मोटारसायकलवरुन आलेल्या पाच जणांनी शस्त्राचा धाक दाखवुन त्याच्याकडील 12 हजार 500 रुपये रोख व घड्याळ बळजबीने चोरुन नेले. ही घटना नगर औरंगाबाद रोडवरील पोखर्डी शिवारात गजराज नगर फाटा येथे रविवारी (दि.28) रोजी पहाटे 4 च्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की, राहुल बाळु लोंढे (वय 25, रा.फक्राबाद,जामखेड) हे त्यांची टाटा कंपनीची बसकर गाडी (क्र.एम.एच.12 एसएफ 9694) घेवुन जात असताना गाडीच्या टायर पंचर झाल्याने औरंगाबाद रोडवरील पोखर्डी शिवारात गजरात फाटा येथे टायर बदलत असताना येथे अपाची टिव्हीएस दुचाकी व एक मोटारसायकल (नंबर माहित नाही) वरुन पाच अनोळखी इसम आले.
त्यांनी गलोल व कोयत्याचा धाक दाखवुन लोंढे यांना धक्काबुक्की करीत त्यांच्याकडील रोख रक्कम व फास्ट स्ट्रूॅक कंपनीचे घड्याळ असा 12 हजार 500 रुपयांचा ऐचज बळजबरीने चोरुन नेला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी राहुल लोंढे यांच्या फिर्यादीवरुन पाच अनोळखी इसमाविरुध्द भादवी कलम 395 प्रमाणे दरोड्याच्या गुन्हयाची नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक जाधोर हे करीत आहे.