विनाअनुदानित शाळा कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार : आ. डॉ. सुधीर तांबे

। संगमनेर । दि. 19 । राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अघोषित, अंशत: विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वेतन मिळण्यासाठी नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. राज्य सरकारने निधी मंजूर केल्याचे विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना वेतन मिळणार असल्याचे आमदार डॉ. तांबे यांनी संगितले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारने प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल आमदार डॉ. तांबेसह शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मंत्री गायकवाड यांचा सत्कार केला. ४७ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षक संघटनांचे आंदोलन सुरू होते. 

 

सुरुवातीपासून आमदार डॉ. तांबे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ठाण मांडून होते. मंत्री थोरातांच्या माध्यमातून सरकारकडे निधीची मागणी केली. अधिवेशनात पहिल्याच दिवशी पुरवणी मागणी मंजूर झाली. मात्र शासनाचा निधी वितरीत करण्याचा अध्यादेश नव्हता. आमदार डॉ. तांबे यांनी शालेय शिक्षण व वित्त विभागाकडे पाठपुरावा करून गुरुवारी निधी वितरित करण्याचा अध्यादेश मंजूर करुन घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post