। अहमदनगर । दि.03 मार्च । चार अनोळखी चोरांनी घरात घुसून महिलेच्या कानाती ल व घरातील त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल असा ऐवज चोरून नेला.हि घटना नगर तालुक्यातील घोसपुरी येथे शनिवारी ( दि.27 ) रात्री घडली.
या बाबतची माहिती अशी की सौ. संगीता रावसाहेब झरेकर ( वय.38 रा.घोसपुरी ता.नगर ) या त्यांच्या घराच्या पडवीत झोपलेल्या असता रात्री कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजाने त्यांना जाग आली.त्यांनी उठून आजूबाजूला पाहिले असता घरासमोर चार इसम अंधारात उभे असलेले दिसले.
त्यांनी सौ झरेकर यांना शांत झोप तुम्हाला काही करणार नाही असे म्हणून त्यांच्या कानातील सोन्याचे फुले बळजबरीने काढून घेतले ,कानातील फुले काढताना झरेकर या जखमी झाल्या. चोरांनी झरेकर यांच्या घरात घुसून आतील सामानाची उचकापाचक केली. कपाटात पिशवीत ठेवलेले त्रेपन्न हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने बळजबरीने चोरून नेले.
सौ झरेकर यांचे मुंबई येथे गेलेले नातेवाईक मुंबईहून आल्या नंतर सौ.संगीता झरेकर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा द वि कलम 394 34 प्रमाणे अवधूत कुंजा चव्हाण यांच्या सह अन्य तीन अनोळखी इसमाविरुद्ध जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धारवाल हे करीत आहेत.