। अहमदनगर । दि.16 फेब्रुवारी । अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पोलीस अधिकार्यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या, नेमणुका करण्याविषयी सखोेल चर्चा व विचार विनिमय करण्यात आलेे.
त्याच प्रमाणे बदल्यांबाबत जनहितार्थ, कायदा व सुव्यवस्था, प्रशासकिय निवडी नुसार व विनंती नुसार सन 2015 च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1851 मधील कलम 22 (न) चे पोेटनियम (1) ब (2) तसेच आस्थापना मंडळास कायद्यान्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन सर्वानुमते निर्णय घेेऊन पोेलीस निरिक्षक व सहायक पोलीस निरिक्षक व सहाय्यक पोेलीस निरिक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या.
या बदली प्रक्रियेत बदली झालेले पोलीस अधिकारी यांचे नाव सध्याचे नेमणुकीचे ठिकाण, नव्याने बदली झाल्याचे ठिकाणी पुढील प्रमाणे आहे.
पोलीस निरिक्षक विजय मारुती करे यांची नियंत्रण कक्ष येथुन नेवासा पोेलीस ठाणे येथेे बदली झाली.
सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र गोपाळ साबळे यांची संगमनेर शहर पोलीस ठाणे येथुन राजूर पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे.
सपोनि शिशिरकुमार कैलास देशमुख यांची एलसीबी येथुन भिंगार कॅम्प पोलीस ठाणेे येथे बदली झाली आहे.
सपोनि मोहन माणिक बोरसे यांची एमआयडीसी पोलीस ठाणे येथुन नियंत्रण कक्ष येथे बदली झाली.
सपोनि युवराज अरविंद आठरे यांची नियंत्रण कक्ष येथुन एमआयडीसी पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या पोेलीस अधिकार्यांनी बदली झालेल्या ठिकाणी आपल्या पदाचा पदभार स्विकारावा व त्या ठिकाणी नियुक्त असलेल्या प्रभारी अधिकार्यांना अतिरिक्त कार्यभारातुन मुक्त करावे व तसा कार्यमुक्त व हजर बाबतचा अनुपालन अहवाल आस्थापना कार्यालयास सादर करावा असे आदेशात म्हंटले आहे.
