। अहमदनगर । दि.16 फेब्रुवारी । दुकानाच्या दरववाजावाटे आत प्रवेश करुन अज्ञात चोराने दुकानाचेे काउंटर उचकटुन आतील पाच हजार रुपये चोरुन नले.
हि घटना नगर मनमाड रोड लगत हॉटेल अंबिका स्वीट शेजारी असलेल्या वेदांत स्टील दुकानात शनिवारी (दि.13) रोजी रात्री दोन वाजता घडली.
याबाबतची माहिती अशी की, पप्पू दिनकर बडे (वय 32, रा.पितळे कॉलनी, नागापूर ) यांचे मनमाड रोडवरील हॉटेल अंबिका स्वीट शेजारी वेदांत स्टील नावाचे दुकान आहे.
शनिवारी रात्री अज्ञाच चोरानी दुकानाच्या दरवाजावाटे आत प्रवेश केला. दुकानाातील काऊंटर उचकटुन आतील पाच हजार रुपये चोरुन नेले.
याप्रकणी एमआयडीसी पोलीसांनी पप्पू बडे यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्हयाची नोंंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक दाताळ करीत आहेत.
