। अहमदनगर । दि.26 फेब्रुवारी । टपरी समोर व्यवहार करू नका येथे येऊ नका असे म्हंटल्याच्या रागातून 17 ते 18 जणांच्या जमावाने लाकडी दांडके व लोखंडी रॉडने एकास बेदम मारहाण केली .हि घटना व्यकटेश सोसायटी, शिवाजीनगर येथे बुधवारी ( दि.24 ) रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की नितीन विश्वनाथ मंजुळे ( वय.25 रा व्यंकटेश सोसायटी शिवाजीनगर ) हे घरी असताना राम साळवे ,अक्षय साळवे, निलेश गायकवाड, संतोष पवार,मुन्ना ( पूर्ण नाव माहित नाही ) मुन्नाचा भाऊ ( नाव माहित नाही ) व त्यांचे 10 ते 12 साथीदार (सर्व रा.शिवाजीनगर ) हे हातात लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेऊन आले.व किरण कोठे आहे अशी विचारणा केली.
यावेळी किरणचा भाऊ नितीन याने काय झाले अशी विचारणा केली.त्यावेळी किरण याने आम्हाला टपरी समोर व्यवहार करू नका येथे येऊ नका असे म्हटले असल्याचे सांगून तो काय लई टपरींवाला झालाय काय असे म्हटले यावर नितीन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला असता जमावाने चिडून त्यालाच बेदम मारहाण केली.मारहाणीत नितीन जखमी झाला.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी नितीन मंजुळे यांच्या फिर्यादीवरून मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली.अधिक तपास पोलीस उप निरीक्षक महाजन हे करीत आहेत.