। अहमदनगर । दि.26 फेब्रुवारी । महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास आलेल्या अतिक्रमण विरोधी पथकास शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी ( दि.24 ) नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील बसस्थानक जवळील ओम बेकर्स अँड डेअरी समोर, महामार्ग नं.661 वरील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक गेले असता तेथील अतिक्रमण काढत असता दत्तात्रय हरिभाऊ जाधव हे तेथे आले व त्यांनी पथकास शिवीगाळ केली.
हि जागा काय तुमच्या बापाची आहे काय असे म्हणून पथकातील कर्मचारी अभियंता राजेन्द्र शिवाजी कुलांगे यांना कामात अडथळा आणला.आणी त्यांना लाथाबुक्क्यांनी ,चापटीने मारहाण केली.या कामासाठी परत आलेतर जीवेचं ठार मारीन अशी धमकी दिली.
या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी राजेंद्र कुलांगे यांच्या फिर्यादीवरून भा.द.वि.कलम 353, 323,504 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार आर एन राऊत ,महिला पोलीस बडे हे करीत आहेत.