। मुंबई । दि.25 फेब्रुवारी । प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली आहे. या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे.
अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कार उभी होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे.
मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी
स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आलाय
मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झालेत. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. नरिमन पाईंटमधला हा रोड आहे. तो व्हीआयपी रोड म्हणून ओळखला जातो. त्या रस्त्यावर नेहमीच मोठा पोलीस बंदोबस्त असतो. या परिसरात ही गाडी सापडल्यानं पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देण्यात आलाय.