याबाबतची माहिती अशी की, तपोवन रोडवरुन बेकायदा मुरमाची वाहतुक करणारा ढंपर येत असल्याची माहिती महसुल विभागाला कळाली त्यावरुन महसुल विभागाच्या पथकाने तपोवन रोडवरील वामनभाऊ चौकात जावून वाळुची वाहतुक करणारा ढंपर (क्र.एम.एच.12 ए.एस.2523) व चार ब्रास मुरुम जप्त केला.
ढंपरवरील पुढील कार्यवाही करण्या करीता ढंपरचालक राजू पठाण (पुर्ण नांव माहिती नाही) यास ढंपर तहसिल कचेरीत घेण्यास सांगितला. राजु पठाण याने ढंपर तहसिल कचेरीकडे न नेता महसुल पथकाच्या सरकारी अडथळा आणून ढंपरसह पळून गेला.
याप्रकरणी तलाठी विजय बबन बेरड (वय 45. रा.निंबाडी,ता.नगर) यांच्या फिर्यादीवरुन ढंपरचालक राजु पठाण याच्या विरुध्द भादवी कलम 379, 186 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 186 चे कलम 3/15, 5 सह महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 47, 7, 8 प्रमाणे गुन्हयाची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्ष सोळुंखे हे करीत आहेत.