शिक्षकास मारहाण करणार्‍या आरोपीस अटक करावी

। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी ।  रुईछत्तीसी (ता. नगर) येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना मारहाण करणार्‍या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली.


या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना देण्यात आले. या वेळी माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, दत्तापाटील नारळे, शिरीष टेकाडे, संजय कोतकर, प्राचार्य पी. एस. गोरे, सुनील म्हस्के, बद्रिनाथ शिंदे, आशिष आचारी, दिनकर मुळे, भाऊसाहेब जिवडे आदींसह शिक्षक उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post