। अहमदनगर । दि.08 फेब्रुवारी । सामाजिक चळवळीत योगदान देत गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेले जलसंपदा विभागातील कर्मचारी जालिंदर बोरुडे या विभागाचे भूषण ठरले आहे. एक सरकारी कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणात गरीब वंचितांसाठी आरोग्य चळवळ चालवतो हे पाहून भारावलो आहे, असे प्रतिपादन जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केले.
जलसंपदा राज्यमंत्री कडू यांनी नगर येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयास भेट दिली असता त्यांनी बोरुडे यांच्या आरोग्य क्षेत्रात गरजू रुग्णांसाठी सुरु असलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव केला.
यावेळी जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर, मुळाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विकास शिंदे, दहातोंडे, महेंद्र राजगुरु, सरोदे, विनोद परदेशी, प्रविण तिडके उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar.Latest
