या योजनेत मध उद्योगाचे विनामूल्य प्रशिक्षण व साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाव्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनासाठी सहाय्य देण्यात येते. योजनेत वैयक्तीक मधपाळ या घटकासाठी अर्जदार साक्षर व 18 वर्षे वयावरील असावा.
शेती असल्यास प्राधान्य मिळेल. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ या घटकासाठी व्यक्ती 21 वर्षापेक्षा जास्त व दहावी उत्तीर्ण असावा. व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या नावे किमान 2 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावरील शेतजमीन असावी, तसेच मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण व पायभुत सुविधा देण्याची क्षमता असावी.
सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत दिनांक 15 फेब्रुवारी, 2021 असून जिल्हयातील इच्छुक युवक-युवती, शेतकरी यांनी या संधीचा लाभ घ्यावा. संस्था या घटकांसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेचे किमान एक हजार चौरसफुट सुयोग्य इमारत असावी.
संस्थेकडे मधमाशापलन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र,अहमदनगर दुरध्वनी क्र. 0241- 2353410 किंवा राठोड मधुक्षेत्रिक मो. 7769935193 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
