पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

चारचाकी प्रवासी व मालवाहू 

वाहनांकरिता नवीन वाहन मालिका

पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन


। अहमदनगर । दि.06 फेब्रुवारी ।  परिवहन  संवर्गातील चारचाकी  प्रवासी व मालवाहु  वाहनांकरीता दिनांक 12फेब्रुवारी, 2021 रोजी नवीन वाहन मालिका सुरु करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी दिनांक 05 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत खिडकी क्रमांक 19 येथे डिमांड ड्राफ्ट जमा करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी कळविले आहे.


वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड (फोटो आयडी-भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल सह) जोडावा. पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट  ऊू.ठढज, हाशवपरसरी  या नावाने काढावा. डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत बँकेचा असावा, स्टेट बँकेचा डिमांड ड्राफ्ट असल्यास सदर डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प ब्रॅच/ ट्रेझरी ब्रँच , कोड नं. 13296 करीता देय असावा. एकाच परंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकांची यादी दिनांक 10 फेब्रुवारी 2021  बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता चांदणी चौकातील नवीन इमारतीत प्रवेशव्दारावर प्रदर्शित करण्यात येईल.


पसंती क्रमांकासाठी ज्यांनी अर्ज केला आहे अशाच अर्जदारांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2021 बुधवार रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठीच्या पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करुन खिडकी क्र. 19 येथे जमा करावा. एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन बंद सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा  डिमांड ड्राफ्ट धारकांनी दिनांक 11 फेब्रुवारी 2021  रोजी दुपारी 4.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालना बाहेर उपस्थित रहावे.


कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारांसमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल. व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधीत अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच विहीत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दूरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post