। अहमदनगर । दि.18 फेब्रुवारी । शेवगाव तालुक्यातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असून तो त्वरीत सुरळीत कराव अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर संदीपराव बामदळे, कल्पेश ढळे, मनोज मोरे, बाळू बबन जायभाये, शंकरराव नेमाणे, बाळु जायभाय, ज्ञानेश्वर बोडखे, अशोक दुबळे, आबासाहेब बोडखे, राजेंद्र आढाव, अशोक मेरड, अनील काळे, हरिश्चंद्र आढाव, ज्ञानेश्वर थोरात आदींची नांवे आहेत.
निवेदनात म्हंटले आहे की, आपण गेल्या आठ दिवसापासून वीज बिल भरुन घेण्यासाठी तालुक्यातील बर्याच भागातील वीज पुरवठा खंडीत केला आहे. आपण शेतकर्यांना कुठलीही पूर्वकल्पना तसेच नोटीस दिलेली नाही, तरी आपण जर तात्काळ वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल.
शेतकरी सध्या स्थितीत अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे त्यांची परस्थिती अतिषय बिकट झाली आहे. तरी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने शेतकर्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे.
