भोयरे पठार येथे भर दिवसा घरफोडी

। अहमदनगर ।  दि.18  फेब्रुवारी ।   बंद घराचे कुलूप तोडून चोरानी घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. हि घटना मंगळवारी (दि.16) रोजी सकाळी साडे अकरा ते सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या दरम्यान नगर तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली.



अविनाश बाबासाहेब साठे (वय 31, रा.भोयरे पठार, ता.नगर) हे कामानिमत्त कुटुंबासह बाहेर गेले असता अज्ञात चोरानी त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. 

 

आतील सामानाची उचका पाचक करुन कपाटातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने 5 ओम प्रत्येकी 2 ग्रॅम वजनाचे व रोख रक्कम असा 99 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.



याप्रकरणी नगर तालुका पोलीसांनी अविनाश साठे यांच्या फिर्यादीवरुन घरफोडीच्या गुन्हयाची नोंद केली असुन पुढील तपास फौजदार जाखाल हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post