शनिवारी उपनगरांत पाणी नाही ; दुरुस्तीसाठी शटडाऊन

। अहमदनगर । दि.04 फेब्रुवारी । महावितरण व महापारेषण कंपनीकडून मुळा धरणाच्या वाहिनीवर तातडीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवारी शटडाऊन घेण्यात येणार आहे. यामुळे  शनिवारी (दि.6) रोजी उपनगरातील भागात दुपारी 12 नंतर होणारा पाणीपुरवठा होणार नाही. यामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये बदल कण्यात आला आहे.

 

शनिवारी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजपर्यंत महावितरणाकडू शटडाऊन घेण्यात येणार असल्याने तसेच या वेळेत मनपाच्याही पाणी योजनेतील दुरुस्तीचे काम होती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा हा काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळेच शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाणी टाक्या भरण्यास अडचण येणार आहे.


शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोड, शिवाजीनगर या भागात 12 नंतर पाणीपुरवठा होऊ शकनार नाही.


या भागामध्ये रविवारी (दि.7) रोजी पाणी सोडण्यात येईल. रविवारी ज्या भागात म्हणजेच शहरातील मध्यवर्ती भागात सर्जेपूरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, माळीवाडा, बालिकाश्रम, सारसनगर, बुरुडगाव रोड परिसर व सावेडी या भागात पाणीपुरवठा होणार नाही.या भागात सोमवारी दि.8 रोजी पाणीपुरवठा होणार आहे.


तसेच सोमवारी नियोजित पाणीपुरवठा होणार्‍या भागात म्हणजेच मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडाई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी रोड, या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको, सावेडी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवार दि.9 रोजी होणार आहे. तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करुन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post