या कारवाईत 30 लाख 8 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई हिवरे बाजार गावाच्या शिवारात हिवरेबाजार ते निमागाव वाघा जाणारे रोडवर बुधवारी (दि.3) सहाच्या सुमारास केली.
नगर तालुका पोलिस पहाटे पेट्रोलिंगगस्त करीत असताना हिवरेबाजार गावच्या शिवरात हिवरेबाजार ते निमगाव वाघा रोडवर वाळू घेऊन जाणारा ढंम्पर आढळुन आला.
पोलिसांना ढम्परचा संशय आल्याने त्यांनी ढम्पर थांबवून चौकशी केली असता ढम्परमध्ये चारब्रास मिळुन आली. चालकाकडे कागदपत्र व परवानगीची चौकशी केली असता.
कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ढम्पर (क्र.एमएच 02 इआर 3680) व आतील चार ब्रास वाळू असा 10 लाख 8 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी जमादार संभाजी डेरे यांच्या फिर्यदीवरुन ढम्पर चालक सुनिल ओंकार उमाप (वय 26, रा.खारे खुर्जने) यांच्या विरुध्द भादंवि कलम 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3,15 प्रमाणे गुन्हयाची नोंद केली असुन पुढील तपास पोलिस नाईक मरकड हे करीत आहे.
