जिल्हा परिषद सदस्य सदाअण्णा पाचपुते यांच निधन

। अहमदनगर ।  दि.20  फेब्रुवारी । माजी मंत्री तथा श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिव उर्फ सदाअण्णा पाचपुते यांच (दि.19) रोजी शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यासह  राजकीय - सामाजिक क्षेत्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सदाशिव पाचपुते यांच्या मागे पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

 

आयुष्यात एकदाही निवडणूक लढवणार नाही असे म्हणणारे पाचपुते यांनी यावेळी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजयी झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेत भाजप गटनेतेपदी त्यांची निवड झाली होती. सदाअण्णा साईकृपा शुगर प्रायव्हेट लिमिटेड ढवळगावचे अध्यक्ष होते .काष्टी येथील कृष्णाई डेअरी चे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे.  

 

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये बबनराव पाचपुतेंचे वलय निर्माण करण्यामध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा होता. राजकीय भूमिकेमध्ये सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचत त्यांनी पाचपुते कुटुंबीयांविषयी तालुक्यात एक वेगळी छवी निर्माण केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post