जुगार अड्ड्यावर श्रीरामपुरात छापा

। अहमदनगर । दि.23 फेब्रुवारी । श्रीरीामपूर तालुक्यातील हरेगाव ते उंदिरगाव जाणार्‍या रस्त्यावर एका टपरीच्या आडोशाला तिरट नावाचा जुगार खेळणार्‍यांवर छापा टाकण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने केली आहे.


सचिन लक्ष्मण गायकवाड (वय 39, रा. उंदीरगाव ता. श्रीरामपूर), दीपक मेघन भोसले (वय 45,  रा. डी. क्वार्टर, ता. श्रीरामपूर) मयूर सर्जेराव पगारे (वय 24, रा. उंदीरगाव तालुका श्रीरामपूर) या तिघा जुगार्‍यांना अटक करण्यात आली ओह. त्यांच्याकडून सुमारे  69 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

 

सदर भागात तिरट नावाचा जुगार नित्यनियमाने खेळत असल्याचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत कळाले. त्यानंतर त्यांनी पोलीस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश काढले. पोलीस आल्याचे पाहाताच चार जणांनी अड्ड्यावरून धूम ठोकली. तर तीन जण पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. 

 

अन्य चार आरोपी फरार असून सर्व आरोपींविरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक  मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल भोईटे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदिंनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post