। मुंबई । दि.28 फेब्रुवारी । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी आज आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला आहे.
संजय राठोड यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री व संजय राठोड यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा देतो पण तो या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा, अशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद राहण्यासाठी राठोड यांनी प्रयत्न केले. ते सर्व निष्फळ ठरले आहेत.
संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना व महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती. आता राठोड यांनी राजीनामा दिल्याने सरकारवर होणारे आरोप थांबणार आहेत.