स्वतःच्या जीवाची परवान न करता समाज आणि समाजातील लोकांसाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे : आमदार संग्राम जगताप

। अहमदनगर । दि.22 फेब्रुवारी ।शहरातील राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री जगन्नाथ बोडखे यांना राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ यांचा कोरणा योध्दा पुरस्कार नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आला . श्री जगन्नाथ बोडखे यांनी कोरोना काळात शहरातील गोरगरिबांना मदत केली त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला . 

 

यावेळी आमदार संग्राम भैय्या जगताप म्हणाले की आपण संपूर्ण देशात एकजुट होऊन कोरोना माहामारीशी लढत आहे . अशा कठिण परिस्थितीत आपण स्वतःच्या जीवाची परवान न करता समाज आणि समाजातील लोकांसाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे . आपल्या सेवेने सर्वासमोर मानवतेचे एक नवीन आदर्श उदाहरण ठेवले आहे . 

 

राष्ट्रीय मानव अधिकारांचे सुरक्षा संघाचे जिल्हाध्यक्ष अँड महेश शिंदे म्हणाले की आपल्या पर्याला आपल्या नि त्याचं कतृत्वाला राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ , सलाम करत आहे असेच सरकार्य आपल्या हाताने नेहमी पडावे अशी अपेक्षा करतो व आपणांस कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानीत करीत आहोत असे शिंदे म्हणाले.

 

यावेळी , क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने , मानवाधिकार सुरक्षा संघाचे राज्य राज्य अध्यक्ष संदीप लोंढे , लीगल सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत साळुखे नगरसेवक प्रकाश भागानगरे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले , जिल्हाध्यक्ष महेश शिंदे , अ‍ॅड. अनिता दिघे , शिवाजी नवले , पोपट बनकर , शामू लोंढे , श्रीकांत यादव , सागर आलचेट्टी , रंजनी ताठे , नयना बनकर , आरती शिंदे आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post