पाथर्डीत 23 हजारांच्या गुटख्यासह तंबाखू जप्त

। अहमदनगर । दि.22 फेब्रुवारी ।  पाथर्डी शहरातील विविध टपर्‍यांवर धाड टाकून नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 23 हजार रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली आहे.  याप्रकरणी सात जणाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. चार जणांना अटक तर तीन जण पसार झाले आहे.


शहरात माव्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. पाथर्डीचा मावा रोज खासगी बसमधून मोठ्या शहरात जातो. तालुक्याच्या छोट्या गावांमध्ये ग्रामीण भागात मावा पाथर्डीतन वितरित होतो. मावा बनवण्यासाठी कच्चा मालाची ही विक्री जोरात सुरु होती. गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डीत छापा टाकला.


त्यांना समीर मुनीर शेख (इंदिरानगर), स्वप्नील राजेंद्र सरोदे (रा.पिंपळनेर), किशोर रतन जगधने (रामगिरीबाबबा टेकडी) अक्षय गणेश विधाटे, गणेश सुनिल शिंदे, गणेश अशोक हादरे (रा.पाथर्डी) हे राज्य सरकारी प्रतिबंध घातलेल्या सुगंधी सुपारीपासून मावा तयार करताना आढळले.


यामधील समीर मुनीर शेख, स्वप्नील राजेंद्र सरोदे, सुरेश तुकाराम कोकाटे, किशोर रतन यांना पोलिसांनी अटक केला आहे. अक्षय गणेश विधाटे, गणेश सुनील शिंदे, गणेश अशोक हारदे हे पोलिसांना पाहून पळून गेले.

Post a Comment

Previous Post Next Post