देवगड फाट्याजवळ कार व ट्रॅव्हल बसचा भिषण अपघात : पाच जण जागीच ठार

। अहमदनगर । दि.22 फेब्रुवारी । औरंगाबादकडुन नगरकडे येणार्‍या स्विप्ट कारला समोरुन वेगात आलेल्या ट्रॅव्हल बसने जोरात धडक दिली. या धडकेत कारमधील पाच जण जागीच ठार झाले. ही घटना नगर औरंगाबाद रोडवरील देवगड फाट्याजवळ सोमवारी (दि.22) रोजी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.


या बाबतची माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास नगरकडुन भरधाव वेगात औरंगाबादकडे जाणाार्‍या ट्रॅव्हल बस (क्र.एम.एच 19, वाय 7123) ने औरंगाबादकडुन नगरकडे येणार्‍या स्विफ्ट कारला (क्र.एम.एच.21 बी.एफ 7178) समोरुन जोरात धडक दिली.


या धडकेत कार मधील जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच, नेवासा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. स्थनिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना उपचारा करिता ग्रामीण रुग्णालयात नेले.


परंतु उपचारापुर्वीच पाच ही जण मयत झाले. अपघातात कारचा चकनाचूर झाला. अपघातातील मृताची नावे उशिरापर्यंत समजु शकली नाहीत. सर्व मयत हे जालना जिल्हयातील असल्याचे समजते.


याप्रकरणी नेवासा पोलीसांनी भादविं कलम 304 (अ), 279, 337, 338, 427 मोटारसायकल कायदा कलम 187, 134 (अ) (ब) प्रमाणे अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली. अधिक तपास नेवासा पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post