पिंपळगाव माळवी येथे विजेअभावी पिके धोक्यात!

। अहमदनगर । दि.05 फेब्रुवारी । नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील शेतकर्‍यांची महावितरणकडून अडवणूक केली जात असल्याने येथील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत.


यंदा शेतकर्‍यांनी गहू, हरभरा, कांदे यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. पिंपळगाव-वडगाव हद्दीवर असलेल्या पठाण वस्ती येथील ट्रान्स्फॉर्मर तीन महिन्यांपूर्वी जळाला आहे. परंतु महावितरणने अद्याप बदलून दिला नाही.


त्यामुळे या परिसरातील सुमारे 50 शेतकर्‍यांची उभी पिके जळाली आहेत. शेतकर्‍यांनी नगदी पिके संत्रा, कोबी, फ्लॉवर घेतली होती. पण पाणी असूनही महावितरणमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे.


शेतकरी शिवाजी शेवाळे, हरिभाऊ झिने, नंदू साबळे, भाऊराव झिने, नवनाथ गुडगळ, शंकर कारंडे यांनी महावितरणने ट्रान्स्फार्मर बदलून देण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post