अहमदनगर जिल्ह्यात आज ९९ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

आतापर्यंत ७१ हजार १९३ रुग्ण बरे होऊन परतले घरी
 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के

आज ६५ रूग्णांना डिस्चार्ज तर 

९९ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर 

 

। अहमदनगर । दि.12 फेब्रुवारी । जिल्ह्यात आज ६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार १९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे. 

 

दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११४१ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१ आणि अँटीजेन चाचणीत २० रुग्ण बाधीत आढळले.

 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, कर्जत ०३, पाथर्डी ०२, संगमनेर ०७, शेवगाव ०२ आणि श्रीगोंदा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, जामखेड ०१,  कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०९, पारनेर ०२, पाथर्डी ०१, राहता ०९, संगमनेर ०५, शेवगाव ०१ आणि श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज २० जण बाधित आढळुन आले. अकोले ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०४, राहता ०५, राहुरी ०१, संगमनेर ०५, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०१, जामखेड ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १०, नेवासा ०१, पारनेर १०, पाथर्डी ०२, राहाता ०७, राहुरी ०१, संगमनेर ०४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या : ७११९३

*उपचार सुरू असलेले रूग्ण : ११४१

*मृत्यू : १११५

*एकूण रूग्ण संख्या : ७३४४९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक १२ फेब्रुवारी, २०२१, सायं.६ वा 


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

माझे कुटुंब माझी जबाबदारी        

Post a Comment

Previous Post Next Post