पोलीसांच्या ताब्यातुन ढंपर चालक पसार

। अहमदनगर । दि.12 फेब्रुवारी ।  विना परवाना बेकायदेशीर रित्या वाळू वाहतुक करणारा ढंम्पर चालक पोलीसांच्या ताब्यातून पळून गेला. ही घटना संगमनेर ते लोणी जाणारे रोडवर, वडगाव पान शिवरात मल्हार हॉटेल जवळ गुरुवारी (दि.11) रोजी एक वाजण्याच्या सुमारास घडली.


संगमनेर तालुक्यातील संगमनेर ते लोणी जाणारे रोडवर वडगाव पान शिवरात मल्हार हॉटेल जवळुन विना परवाना वाळूची चोरटी वाहतुक करणारा ढंम्पर (क्र.एम.एच.46-1649) संगमनेर पोलिसांनी पकडला.


ढंम्पर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी संगमनेर पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना ढंम्पर चालक सतिष संपत रोडे (रा.येठेवाडी, ता.संगमनेर) याने अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या ताब्यातुन पसार झाला.


या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी पो.ना.डमाळे यांच्या फिर्यादीवरुन ढंम्पर चालक सतिष रोडे व ढम्पर मालक विरुध्द चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पो.ना.दातीर करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post