। अहमदनगर । दि.26 फेब्रुवारी । नगर शहरासह जिल्ह्यात 19 ते 24 फेब्रुवारी या सहा दिवसांच्या कालावधीत जिल्हा पोलिसांनी कोरोनाचे नियम न पाळणार्या एकूण पाच हजार 951 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून सहा लाख एक हजार 700 रुपये दंड वसूल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
एसपी पाटील म्हणाले, कोरोना रुग्ण वाढत असल्याने सध्या नगर जिल्ह्यात पोलिसांची 54 पथके नेमण्यात आली आहेत. तसेच हेडक्वार्टरकडूनही काही पथके नेमली आहेत.
19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या सहा दिवसांत जिल्ह्यातील 499 जीवित आस्थापना (मंगल कार्यालये) यांना 149ची नोटीस देऊन त्यांना ‘नो मास्क नो एण्ट्री’ अशा पध्दतीने कसे धोरण राबविण्यात येईल, याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यात विना मास्क फिरणार्या पाच हजार 652 जणांवर कारवाई केली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणार्या 162 जणांवर कारवाई केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या 137 जणांकडून दंड वसूल केला आहे.