नगर-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

रस्त्याच्या कामासाठी नगर-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको


। अहमदनगर । दि.08 फेब्रुवारी । वाळूंज शिवारातील बायपास रोडचे अर्धवट अवस्थेतील काम मार्गी न लावल्यामुळे बाजार समितीचे उपसभापती  संतोष म्हस्के याच्या नेतुत्वा खाली नगर सोलापूर महामार्गावर आज सकाळी नऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर बांधकाम विभागाच्या कार्यालयात येऊन आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला . 

 

वरिष्ठाशी चर्चा करुन या रस्त्याच्या दुरुस्ती साठी निधी इतर योजनेतून कसा मिळतो ते पाहू असे आश्वासन बांधकाम विभागाचे डि.एच. बांगर यांनी यावेळी वांळुज( ता. नगर ) येथील बायपास रस्त्याचे काम आठ वर्षापूर्वी झाले . मात्र गावाजवळील एक किमी रस्ता चे काम अपुर्ण ठेवले . या परीसरात मोठमोठाले खड्डे पडले आहे . धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे . अवजड वाहनामुळे  पिकावर धुळ बसत आहे .पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. 

 

पिक काढण्यासाठी कामगार मिळत नाही . शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे . या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन होते मात्र याची दखल न घेतल्यामुळे सोलापुर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. बाहयवळण रस्त्याच्या डागडुजीसाठी कोटयावधी रुपयांचे काम एका खाजगी एजन्सीला दिलेले होते. परंतू सदर एजन्सीने वेळकाढूपणा करुन रत्याचे काम पुर्ण न करता वाळूंज शिवारातील एक किलोमिटरचा रस्ता अपूर्ण ठेवला आहे. 

 

या खाजगी एजन्सीकडून वेळकाढूपणा केला जात असल्याच्या तक्रारी वरीष्ठ पातळीवर करण्यांत आल्या आहेत.  यावेळी मार्केट समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनिल मोरे, बाळासाहेब दरेकर; विजय शेळमकर, मकरंद हिंगे. सुखदेव दरेकर, तात्यासाहेब दरेकर, संदीप मोरे.,नवनाथ हिंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post