पन्नास हजार वारकरी फिरले माघारी

। पंढरपूर । दि.22 फेब्रुवारी ।  पंढरपुरात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह 44 रुग्ण आहेत. त्यामुळे विठ्ठलाचा होणारा माघ सोहळा प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे.शनिवारी पंढरीत 70 ते 80 हजार भाविक दाखल झाले होते. 


मात्र पोलिसांकडून प्रत्येक मठात नोटिसा दिल्या होत्या. त्यामुळे रविवारी सकाळी पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 50 हजार भाविकांनी परतीचा मार्ग धरला आहे. 

 

त्यामुळे पंढरीत आता आठ ते दहा हजार भाविक असण्याची शक्यता आहे. माघ एकादशिला वारकर्‍यांनी पंढरपुरात येऊन गर्दी करु नये. यासाठी प्रशासनाने 23 फेब्रुवारीला संपुर्ण दिवस संचारबंदी आदेश काढला आहे.


आता पोलिसांनी पंढरपुरातील मठात जे वारकरी आधीच येऊन राहिले आहेत. अशा वारकर्‍यांना मठात न राहाता आपआपल्या गावी परत जाण्यासाठी नोटीसा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post