शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द
। मुंबई । दि.22 फेब्रुवारी । राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला काळजी घेण्याचे तसेच नियमावलींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन आणि दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे.गर्दी टाळून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सभा, आंदोलने किंवा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 21 फेब्रुवारीला सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या होत्या.
