महाअ‍ॅग्रो फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी सचिन ठुबे

। अहमदनगर । दि.07 फेब्रुवारी । ब्राम्हणी येथील ग्रीनअप फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन ठुबे यांची महाअ‍ॅग्री एफपीसी फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.


ग्रीनअप फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून सचिन ठुबे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाग्री एफपीओ फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी ठुबे यांची निवड करण्यात आल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष विजय गोफने यांनी दिली.


महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात शेतकर्‍यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांना व्यवसायाचे विविध परवाने उपलब्ध करून देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभे करणे, शेतमालाच्या किंमत वाढीसाठी मूल्यवर्धन साखळी तयार करणे,


शेतीसाठी आवश्यक असणार्‍या सर्व निविष्ठा शेतकर्‍यांना उपलब्ध करून देणे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पीकनिहाय क्लस्टर डेव्हलप करणे, शेतमालाची आयात निर्यात करणे या विषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम फेडरेशन मार्फत केले जात आहे. 


महाराष्ट्रातील 1250 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 750 सहकारी संस्था महाग्री फेडरेशनच्या सभासद आहेत. या सर्व संस्थांची वार्षिक उलाढाल दीडहजार कोटी रुपयांची असून या संस्थेच्या उपाध्यक्षपदी सचिन ठुबे यांची निवड झाल्याने शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे. फेडरेशनच्या माध्यमातून जिल्हानिहाय क्लस्टर व विपणन व्यवस्था स्थापन करण्याचे काम सुरू आहे.


शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून परिसरातील शेतमाल परदेशात पोहोचवण्याचे काम फेडरेशनच्य माध्यमातून सुरू आहे. सचिन ठुबे यांच्या निवडीबद्दल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी अभिनंदन केले. 

Post a Comment

Previous Post Next Post