बेशुद्धधावस्थेत आढळलेल्या महिलाचा मृत्यू

। अहमदनगर । दि.22 फेब्रुवारी ।  अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या गेटसमोर एक 30 ते 35 वयोगटातील अनोळखी महिला बेशुद्धावस्थेत नागरिकांना आढळून आली. हि घटना अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे गुरूवारी (दि. 18) दुपारी घडली. रेल्वे स्टेशनच्या गेटसमोर आढलेल्या महिलेसंबंधी स्थानिक नागरिकांनी कोतवाली पोलिसांना कळविली. 

 

पोलिसांनी त्या महिलेस उपचाराकरिता जिल्हा रूग्णालयात दाखल केले. औषधोपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सी आर पी सी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलिस नाईक आण्णा बर्डे हे करीत आहेत. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. 

 

मृत महिला 30 ते 35 वर्षांची असून तिचा वर्ण सावळा शरीरबांधा मध्यम आहे. हिरव्या रंगाचा टॉप व नाईट पॅण्ट आहे. या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास अगर तिच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास कोतवाली पोलिस ठाणे फोन 2416117, पोलिस नाईक बर्डे मो. 7387654905 वर संपर्क साधावा असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post